मुंबई : बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे. मात्र आजही त्यांचा उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही अक्टिव्ह असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान सहान घडामोडींची माहिती ते ट्विटरच्या माध्यमातून देत असतात.  


लंडनमध्ये अमिताभ बच्चन  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अमिताभ बच्चन लंडनमध्ये आहेत. ग्लास्कोमध्ये बीग बी चित्रपटाच्या 'बादल' शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मात्र ग्लास्कोच्या रस्तावर एका व्यक्तीने अमिताभ बच्चन यांना सलमान खान हाक मारत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 


अमिताभ बच्चन यांनी या प्रसंगाची माहिती देताना एक फोटोदेखील शेअर केला आहे. 


 



 सूजय घोष 'बादल' सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. या थ्रिलर चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. तर त्यांच्या सोबतीला 'पिंक' फेम तापसी पन्नूदेखील झळकणार आहे. तर शाहरुख खान या चित्रपटाचा निर्माता आहे.