आधी मॅडम अन् आता `या` नावानं पत्नी जया बच्चन यांना हाक मारतात अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांना कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल `कौन बनेगा करोडपती` या कार्यक्रमात सांगितलं आहे.
Amitabh Bachchan:सोनी टीव्हीवर दाखवला जाणारा रिअॅलिटी शो 'कौन बनेगाा करोडपती' अर्थात केबीसी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. त्यांचा सूत्रसंचालनचा वेगळा अंदाज, पंचेस प्रेक्षकांना भावतो त्यामुळे हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अनेकजण करोडपती होण्यासाठी तर काहीजण सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना भेटता येईल या आशेनं कार्यक्रमात सहभागी होतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेत लाखो लोक सहभागी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. या कार्यक्रमामुळे अनेक जणांचे नशीब पालटलं आहे. सध्या या कार्यक्रमाचं 15 वं पर्व सुरु आहे. अनेक वेगवेगळ्या कारणांवरुन हे पर्व नेहमी चर्चेत असते. अनेकदा स्पर्धक त्यांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से सांगत असतात त्यावर बिग बी सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्यातील काही किस्से सांगताना दिसतात.
केबीसीचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी त्यांचा आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांचा संबंधीत एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणजे ते जया बच्चन यांना कोणत्या नावाने हाक मारतात. बिहारच्या सुजित कुमार यांच्यासोबत गेम सुरु होता. त्यावेळी सुजित कुमार यांनी सांगितले की ते एक ड्राइव्हर आहेत आणि लोकसेवा परीक्षेची तयारी करत आहेत. पुढे ते म्हणाले की 'मी माझ्या पत्नीला घरी मॅडम म्हणून हाक मारतो'.
आता 'या' नावाने हाक मारतात..
यावर बिग बी पटकन म्हणाले मी सुद्धा माझ्या पत्नीला मॅडम म्हणूच हाक मारत होतो. मॅडम म्हणून जया यांना हाक मारल्यावर कामं पटकन होऊन जायची' जसं की, 'अरे मॅडम जरा सुनीये, जरा यहा आईये तो' यावर सुजित यांनी विचारले की तुम्ही जया बच्चन यांना आता कोणत्या नावाने हाक मारता? तेव्हा बिग बी म्हणाले मी 'आता त्यांना देवी असं म्हणतो' हे ऐकल्यावर सर्वजण हसले. दरम्यान, सुजित यांनी या शोमध्ये 6 लाख 40 हजार रक्कम जिंकली.
मध्यंतरी बिग बी 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम सोडणार आहेत अशी चर्चा रंगली होती, शो मध्ये अनेकदा स्पर्धक त्यांना वैयक्तिक गोष्टी सांगत असतात अश्याच एका स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नावर बिग बी गंमतीत म्हणाले होते की मला सूत्रसंचालन पदावरून काढून मॅरेज काउन्सलिरची पोझिशन द्या.