मुंबई :  बच्चन कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं मोठं फॅन फॉलोविंग आहे. बॉलिवूडमधून सर्वात चर्चेत असलेलं कुटुंब म्हणजे अमिताभ बच्चन यांचं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्यापासून त्यांचा नातू अगस्त्य नंदा सगळ्यांचीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते. बच्चन कुटुंबातील सर्वात लहान मुलगी आराध्या केवळ 10 वर्षांची आहे, पण ती देखील लोकप्रिय आहे. अलीकडेच तिच्या फॅन पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे जो सगळ्यांचे लक्षवेधून घेणारा ठरत आहे.


हा फोटो कितीही जुना असला तरी त्या फोटोतील भावना सगळ्यांनाच अनुभवता येत आहेत. आजोबा आणि नातीचे प्रेम या फोटोत पाहायला मिळत आहे.



व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आराध्या बच्चन 6 वर्षांची असल्याचं बोललं जात आहे. ती आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पकडा पकडी खेळताना दिसत आहे. हा फोटो बागेत दोघंही खेळत असताना काढण्यात आले आहेत.


आराध्या पुढे आणि अमिताभ बच्चन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.  हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.