`आयुष्य कधीच...`, अभिषेकनं Divorce च्या पोस्टला लाईक केल्यानंतर वडील अमिताभ यांची खास पोस्ट
Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची ती पोस्ट लाइक केल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टची सर्वत्र चर्चा
Amitabh Bachchan Post : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या सगळ्यात अभिषेक बच्चन घटस्फोटाची एक पोस्ट लाइक केली आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात आता अभिषेक बच्चन ही पोस्ट लाईक केल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट आधीच्या ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून शेअर केली आहे. अमिताभ यांनी या पोस्टमध्ये 'कौन बनेगा करोडपति' च्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये बिग बींनी लिहिलं की 'काम काम काम... हे कठीण आहे... पण आयुष्य हे कधीच सोपं नसतं.'
अमिताभ यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तर त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी कमेंट करत म्हणाले की या वयात कोणी इतकं काम करण्यासाठी इतकं मोटिव्हेटेड कसं राहू शकतं. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्हाला सल्युट आहे तुम्ही आजही इतकी मेहनत करत आहात. तर तिसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही प्रेरणादायी आहात. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी त्यांना कमेंट करत विचारलं की कुटुंबात सगळं ठीक आहे ना?
खरंतर या आधी अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या एका पोस्टला लाईक केलं होतं. त्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की जेव्हा प्रेम संपतं तेव्हा जोडपं अगदी सहजपणे विभक्त होतात. तर घटस्फोटाला कोणती गोष्टी कारणीभूत ठरते आणि घटस्फोट वाढण्याची कारणं काय आहेत. घटस्फोट सगळ्यांसाठी सोपा नाही. पण कधी-कधी आपण जसा विचार करतो तसं होत नाही. पण लोकं इतक्या वर्षांपर्यंत एकत्र राहिल्यानंतर विभक्त होण्याच्या त्रासातून कसे बाहेर पडतात.
हेही वाचा : 'तिला माझ्या परवानगीची गरज नाही...', ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट व्हायरल
दरम्यान, अनंत आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र आले होते. तर अभिषेक हा वडील अमिताभ, आई जया, बहीण श्वेता बच्चन, भाची नव्या आणि भाचा अगस्त्य यांच्यासोबत पोहोचला होता. अशात कुटुंबाला वेगवेगळं पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं होतं.