मुंबई : सलमान खान हा त्याच्या आगामी ‘रेस ३’ सिनेमाबाबत फारच उत्सुक आहे. खासकरून या सिनेमातील कास्टमुळे. आधी आलेल्या वॄत्तानुसार या सिनेमात सलमान खान, जॅकलिन आणि अमिताभ बच्चन दिसणार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता ताज्या माहितीनुसार, अमिताभ यानी या सिनेमाची ऑफर रिजेक्ट केली आहे. अमिताभ यांनी सांगितले होते की, या सिनेमासाठी त्यांना आधी विचारण्यात आलं होतं. त्यानंतर हा रोल आदित्य पांचोलीला देण्यात आलाय. पण अमिताभ बच्चन यांनी या सिनेमातील भूमिका का नाकारली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


अमिताभ आणि सलमान यांचं नातं किती खास आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी या सिनेमा ऑफर डेट्समुळे रिजेक्ट केली आहे. अमिताभ हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये फुटबॉल बायोपिक ‘झुंड’ चं शूटिंग करत आहेत. त्याच वेळात ‘रेस ३’चं शूटिंगही आहे. दोन्ही सिनेमांच्या डेट्स क्लॅश झाल्याने त्यांनी हा सिनेमा नाकारला आहे. रेमो डिसुजा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सलमान मुख्य भूमिकेत असेल.