बिग बी नव्हे, या अभिनेत्यावर होतं रेखा यांचं जीवापाड प्रेम; पाहा, नात्यात का आला दुरावा?
असं काय झालं की त्या अनवाणी निघून गेल्या
मुंबई : अभिनेत्री रेखा (REKHA) या कायमच त्यांच्या आरस्पानी आणि चिरतरुण अशा सौंदर्यासाठी आणि अर्थातच त्यांच्या दिलखेचक अदांसाठी ओळखल्या जातात. वाढत्या वयाचा आकडा या अभिनेत्रीपर्यंत पोहोचूही शकलेला नाही, असंच चाहत्यांचं मन. अशा या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य म्हणजे न सुटलेलं कोडं.
बिग बी, अमिताब बच्चन यांच्याशी रेखा यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यांच्या नात्याच्या चर्चाही बऱ्याचदा झाल्या आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, फक्त अमिताभ बच्चनच नव्हे तर आणखी एका अभिनेत्यासोबतही रेखा यांचं नातं अपूर्णच राहिलं होतं.
असं म्हटलं जातं की, राज बब्बर हे त्यांची दुसरी पत्नी स्मिता पाटील यांच्या निधनामुळं पूर्णपणे कोलमडून गेले होते. या काळात रेखा यांनीच त्यांना आधार दिला होता. रेखा आणि राज यांच्यातील जवळीक या दरम्यानच्या काळात वाढली. ते दोघंही एकमेकांसोबत वेळ व्यतीत करू लागले.
सूत्रांच्या माहितीनुसार एका मुलाखतीत खुद्द राज बब्बर यांनीच या नात्यावर वक्तव्य केलं होतं. 'हो त्यावेळी रेखानं मला सांभाळलं होतं. मला तिनं सावरायला मदत केली होती. त्यावेळी तीसुद्धा अशाच एका दु:खातून सावरत होती. आम्ही दोघंही एकमेकांसाठी आधार झालो होतो. पण, काही कारणास्तव आमच्यात दुरावा आला', असं बब्बर म्हणाले होते.
विराटनं पुन्हा मारली बाजी, अनुष्कासाठी उचललं 'हे' पाऊल
रेखा यांच्याशी जवळीक असली तरीही त्यांच्याबाबत आपण जोडीदार म्हणून विचार करत नव्हतो, पण आम्ही फक्त मित्रही नव्हतो. रेखासाठी मला वेगळ्याच भावना होत्या असं म्हणत राज यांनी या नात्याची व्याख्या मांडली होती.
असं म्हटलं जातं की, रेखा यांनी जेव्हा राज बब्बर यांच्याकडे लग्नाचा विषय काढला होता तेव्हा त्यांना नकारार्थी उत्तर मिळालं होतं. राज यांनी दिलेलं हे उत्तर आणि पहिल्या पत्नीकडे परत जाण्याची व्यक्त केलेली इच्छा रेखा यांना हादरा देऊन गेली. या दोघांमध्ये बरीच शाब्दिक बाचाबाची झाली, ज्यानंतर रेखा तिथून तडक निघाल्या आणि अनवाणी पायांनी मुंबईच्या रस्त्यांवरून त्या आपल्या घराच्या दिशेनं निघाल्या. त्या प्रसंगानंतर रेखा यांनी आयुष्याच्या या वळणाकजे पुन्हा कधीच वळून पाहिलं नाही.