दीपवीरच्या लग्नात `त्या` एन्व्हलपमध्ये नेमकं काय होतं?
जया बच्चन यांच्या हातात होतं ते एन्व्हलप
मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही? या ना त्या कारणाने हे लग्न चर्चेत आहे. आता चर्चा होतेय ती या लग्नाच्या मुंबईतील रिसेप्शनमधील एका खास गोष्टीची... शनिवारी 1 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये दीपवीरच्या लूकनंतर आणखी एका गोष्टीने साऱ्यांच लक्ष वेधलं. ती गोष्ट म्हणजे महानायक यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन यांच्या हातातील एन्व्हलपने.
जेव्हा कलाकारांच फोटोसेशन सुरू होतं तेव्हा बिग बी त्यांच्या कुटुंबियांसोबत आले. यावेळी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन अशी मंडळी या रिसेप्शनला उपस्थित होती.
यावेळी जया बच्चन यांच्या हातात एक एन्व्हलप होतं. फोटो काढताना देखील ते त्यांच्या हातात होतं. दीपवीरने रिसेप्शनला कोणतंही गिफ्ट न स्विकारणार असल्याचं सांगूनही बच्चन कुटुंबियांनी हे नेमकं काय आणलं? यावर चर्चा सुरू झाल्या.
काय आणणं म्हणण्यापेक्षा त्या एन्व्हलपमध्ये नेमके किती रुपये असणार यावर अधिक चर्चा सुरू झाल्या. एवढ्या मोठ्या कलाकारांच्या लग्नाला आल्यावर किती रुपये एन्व्हलपमध्ये भरून देतात याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. पण ...
महानायक अमिताभ बच्चन यांनी याचा खुलासा केला आहे. जुनियर आर्टिस्ट किंवा मेकअप मॅन आपल्या सिनियर स्टार किंवा निर्मात्याच्या लग्नामध्ये जाताना संकोच करत असतं. याच दुविधेमुळे आहेर पाकीटामध्ये एकशे एक रुपये भरण्याची सुरुवात झाली.
मग ते अगदी मोठ्यांपासून ते लहान सर्व कलाकारांसाठी एकच सीमा निश्चित केली गेली. असे करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे यामुळे एकरूपता यावी आणि कुणालाही संकोच वाटू नये.