Amitabh Bachchan Poem : काल 23 ऑगस्ट हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण होता. काल चांद्रयान-3 नं चंद्रावर लॅन्ड करत इतिहासात आपले नाव कोरले आहे. सगळ्या भारतीयांना हा क्षण आनंदानं एका उत्साहासारखा साजरा केला. सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच संपूर्ण भारतीयांना शुभेच्छा दिल्या. त्यात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये कविता गायली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौन बनेगा करोडपतिचं हे 15 वे पर्व सुरु आहे. तर त्याच शोचे सुत्रसंचालन अमिताभ करत आहेत. त्या शोच्या सेटवर अमिताभ हे आपण केलेल्या या इतिहासावर कविता गाताना दिसले. त्यातही त्यांच्या आवाजात ही कविता ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच अंगावर शहारे येत आहेत. चला तर पाहुया काय म्हणाले बिग बी 'ये सजता, संवरता निखरता ये देश, जैसे कोई दुल्हन बदलती हो भेष, ये वादे इरादे ये कसम ये नईं, ये मेहनत, मशक्कत ये खुद पे यकीन, यही है यही है सुनहरा सा भारत, हवा में हुनर है, फिजा में महारत, जमीन को फलक को हुआ तब गुमान,लिखा चांद पर हमने जय हिंदुस्तान, लहर है सहर है ये बदलाव की, वतन के जतन से सजे ख्वाब की, जता दो बता दो कि तुम कम नहीं, विजय का लहराना है परचम यही. जहां तुम खड़े हो वहीं हो शुरू, बना दो तुम भारत को सब का गुरू, अमर वो, अटल वो अमिट दास्तान, जिसके पन्नों पर लिखा हो जय हिंदुस्तान. जय हिंद.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर प्रकाश राज यांची नवी पोस्ट! पुन्हा झाले ट्रोल; लोक म्हणाले, 'आता रात्रभर...'


दरम्यान, भारतासाठी खरंच चांद्रयान -3 नं रेकॉर्ड केला आहे. चंद्रावर भारतानं त्याचं नाव कोरलं आहे. त्याचं कारण म्हणजे चांद्रयान -3 नं दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -3 चं यशस्वी लॅन्डिंग करण्यात आलं आहे. फक्त सर्वसामान्य लोक नाही तर सगळ्यांनीच जेव्हा हे चांद्रयान -3 चंद्रावर लॅन्ड करत होतं तेव्हा सगळं काम सोडून त्याकडेच लक्ष ठेवलं होतं. तर हे मिशन श्रीहरिकोटाचे सतीश धवन केंद्रातून सुरु झालं होतं. तर 40 दिवसाचा हा प्रवास पूर्ण करून अखेर चांद्रयान -3 नं यशस्वी लॅन्डिंग केली आहे.