Amitabh Bachchan KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये अभिनेता अमिताभ बच्चन हे नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धकांना भेटतात. अशात ते कधी स्पर्धक त्यांना काही मजेशीर गोष्टी सांगतात तर कधी अमिताभ त्यांच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्से त्यांना सांगतात. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केबीसी 16' मध्ये एक अशी स्पर्धक आली, ज्यांना पाहून अमिताभ यांनी चक्क कपाळाला हाथ मारला आणि म्हणाले की देवीजी तुम्ही मला पागल केलं. या स्पर्धकानं अभिषेक बच्चनला तिचं बॅकअप प्लॅन म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धक महिलेचं नाव रितिका सिंह होतं. हॉटसीटवर बसून खेळ सुरु करण्यासोबतच त्यांनी अमिताभ बच्चन यांना Gen-Z च्या डेटिंग टर्म्स देखील सांगितल्या. रितिकानं जेव्हा अभिषेक बच्चनला बॅकअप प्लॅन आणि जया बच्चन यांना बेंच म्हटलं तेव्हा अमिताभ बच्चन यांना हसू अनावर झालं. रितिका सिंहनं अमिताभ बच्चन यांना सांगितलं की ती तिच्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सल्ला देते असते. कारण आजकाल त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत. आजकालची पिढी रोज वेगवेगळ्या डेटिंग टर्म्सचा वापर करते. जसं की घोस्टिंग, बेंचिंग, ब्रेडक्रम्बिंग वगैरे. त्यानंतर रितिकानं उदाहरण देत अमिताभ यांना डेटिंग टर्मचा अर्थ समजवला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तेव्हा अमिताभ यांनी रितिकाला विचारलं की ब्रेडक्रम्बिंगचा अर्थ चपाती खाणं आहे? तर रितिकानं सांगितलं की 'त्याचा अर्थ मुलगा आणि मुलगी दोघेही हिंट्स देतात, पण ते रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट देत नाहीत.' तेव्हा अमिताभ यांनी विचारलं की 'जर कधी संधी मिळाली तर ते काय म्हणतील. तेव्हा रितिका म्हणाली की ते बेचिंग करतील. निर्मात्यांनी प्रोमो देखील प्रदर्शित केला. यात अमिताभ बच्चन, रितिका सिंगला विचारलं की एक गोष्ट सांग बेंचिंग कोणासाठी फायदे कारक आहे, महिला की पुरुष? तर रितिकानं उत्तर दिलं की सर दोघांसाठी. तुम्ही देखील ठेवू शकता. तुम्ही एका बाजुला मला ठेवा आणि एका बाजुला जया मॅमला ठेवा. हे ऐकून एकीकडे प्रेक्षक हसू लागले, तर अमिताभ यांना आश्चर्य झाले. त्यानंतर रितिकाला विचारलं की जर तुम्ही मध्ये आहात. एकीकडे मी आणि दुसरीकडे अभिषेक तुमचा बॅकअप प्लॅन आहे, तर माझा बॅकअप प्लॅन कोण?' 


हेही वाचा : 'तुंबाड' नं 5 व्या दिवशीही केली बक्कळ कमाई; करीनाच्या 'द बकिंघम मर्डर्स' ला टाकलं मागे


यावर रितिकानं अमिताभ यांना सांगितलं की 'त्यांनी देखील बेंचिंग करायला हवी.' हे ऐकल्यानंतर अमिताभ म्हणाले, 'तिथे तर जागा नाही, तिथे बेंच खूप छोटा आहे.' मग अमिताभ यांनी सांगितलं की 'ते Gen Z आणि त्यांच्या गोष्टी मुळीच समजू शकत नाही.' रितिकाच्या आई-वडिलांना म्हणाले, 'दादा, तुम्ही यांना घरी कसं सांभाशता. ज्या दिवशी बेंचिंग वेंचिंग झालं तर सगळं निघून जाईल. बाई तू मला पागल केलंस.'