Amitabh Bachchan Physics Fail: केबीसी हा शो सगळ्यांच्याच आवडीचा आहे. सध्या या शोची सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. यावेळी अमिताभ बच्नचही आपल्या आयुष्यातील इंटररेस्टिंग किस्से हे सांगताना दिसतात. सध्या त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातला एक किस्सा सांगितला आहे. सध्या त्यांनी सांगितलेल्या या किस्स्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. आपल्या शालेय जीवनात असा एक तरी विषय असेलच ज्यात आपण नापास झालो असूच. हुशार मुलं ही भलतीच हुशार असतात. त्यांच्या हुशारीला कोणीच मात देऊ शकत नाही. परंतु शालेय जीवनातील आयुष्यात आपण एकदा तरी नापास झालेलो असूच. शाळा - कॉलेजमध्ये असतानाही आपला अभ्यासाचा कधी ना कधी कंटाळा हा केलाच असेल. त्यातून रट्टा मारणं हेही आपण केलंच असेल. शाळा आणि अभ्यास हा आपल्यासाठी महत्त्वाचा असला तरीसुद्धा अशाप्रकारे शाळतलं थ्रील हेही काहीसं वेगळंच असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ अभिनेते बिग बीसुद्धा याला चुकलेले नाहीत. सध्या त्यांनी केबीसीतून अशीच आपली एक आठवण सांगितली आहे. यावेळी त्यांनी खुलासा केला आहे की, ते बीएस्सीच्या एका पेपरमध्ये नापास झाले होते. यावेळी ते म्हणाले की त्यांनी ग्रॅज्युएशनच्या वेळी चुकीचा विषय निवडला होता. त्यामुळे त्यांना त्या विषयात पास होणं हे फारच कठीण गेलं होतं. सध्या या 'कौन बनेगा करोडपती'चा 15 वा सिझन सुरू आहे. या सिझनचा 1000 व्या एपिसोडमध्ये त्यांनी ही आठवण शेअर केली. 


त्यांनी पुढे सांगितले की, हा विषय त्यांना सलग तीन वर्षे त्रास देत होता. त्यातून त्यांना फिजिक्स हा विषय अजिबातच आवडतं नव्हता. त्यांना या विषयाबद्दल खूप भीतीही होती. जेव्हा पेपर होण्यासाठी फक्त 2 महिने उरले होते तेव्हा त्यांनी कसबसा सगळा रट्टा मारला आहे. हा रट्टा त्यांनी मारला आणि मग ते त्या विषयात फेल झाले. त्यामुळे त्यांना परत परीक्षा द्यावी लागली होती. 1962 साली त्यांनी किरोडीमल कॉलेज युनिव्हर्सिटीमधून आपलं ग्रॅज्युएशन पुर्ण केले. 


हेही वाचा : रणबीर कपूरला झालंय तरी काय, ED समन्सनंतर वागणुकीत बदल... पापाराझींवर भडकला


सध्या अमिताभ बच्चन यांचा हा शो चांगलाच लोकप्रिय होतो आहे. त्यांचे मागील वर्षी अनेक चित्रपट हे गाजले होते त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 2022 साली आलेला त्यांचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता त्याच्या पुढीला भागाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.