`झुंड`सह बिग बी नागपूरात दाखल
पाहा बिग बी आणि नागराज एकत्र
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमाकरता सोमवारी महानायक अमिताभ बच्चन नागपुरात दाखल झाले. चार्टर प्लेनने बिग बी नागपुरात पोहोचले. झुंड हा सिनेमा अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. आता बिग बींच शूट हे नागपुरमधील मोहन नगरमध्ये असलेल्या सेंट जॉन स्कूलच्या सेटवर केलं जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी मोमिनपुरामधील डोंबी नगरमध्ये याचं शुटिंग झालं. शहरातील अनेक भागात हे शुटिंग सुरू आहे. सोमवारी बिग बींच्या शुटिंगला सुरूवात झाली. आता त्यांच्या प्रत्येक शुटिंग करता महानायक विशेष विमानाने नागपुरात हजर राहणार आहे.
स्वतः बिग बी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी याबाबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या आधीच्या अनुभववावरून नागराज लोकेशन शेअर करायला घाबरत आहे. बिग बींचा अनेक भाग हा रिअल लोकेशनवर शुट करणार आहे.
हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठीत सैराट सारखा ब्लॉक ब्लस्टर सिनेमा दिल्यानंतर आता नागराज हिंदीत पदार्पण करत आहे. आणि ते देखील शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर येत आहे.