50 वर्षांपूर्वी `या` फोटोमुळे अमिताभ बच्चनना मिळाले रिजेक्शन !
एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याचं यश, ग्लॅमर, सुखवस्तू राहणीमान यांची चर्चा अधिक होते. परंतू अनेकदा त्यामागे खूप मोठा संघर्ष असतो.
मुंबई : एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याचं यश, ग्लॅमर, सुखवस्तू राहणीमान यांची चर्चा अधिक होते. परंतू अनेकदा त्यामागे खूप मोठा संघर्ष असतो.
बीग बी - सुपरस्टार
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तीमत्त्वांपैकी एक आहे. मात्र सुरूवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांच्या आवाजामुळे, त्यांच्या उंचीमुळे, लूक्समुळे त्यांना अनेकदा नकार देण्यात आला होता. बॉलिवूडमध्येही त्यांना अनेक प्रोजेक्ट्ससाठी नाकारण्यात आले.
अमिताभ बच्चननी शेअर केला फोटो
अमिताभ बच्चन यांना सुरूवातीच्या काळात बॉलिवूडने स्वीकारले नव्हते, तेव्हाच्या काळातील एक फोटो आणि आठवण बीग बींनी शेअर केली आहे.
1968 साली अमिताभ बच्चनचा एक फोटो पांढर्या सदरा-कुडत्यामध्ये, बागेत क्लिक करण्यात आला होता. पहिल्या प्रोजेक्टसाठी त्यांनी हा फोटो शेअर केला होता. मात्र हा फोटो पाहून 'रिजेक्शन' मिळणं सहाजिक होतं असे त्यांनी म्हटलं आहे.
बीग बींची बॉलिवूड एन्ट्री
1969 साली अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. सुरूवातीचा काळ त्यांच्यासाठी खूपच संघर्षाचा होता.
आज 76 वर्षीय अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान टिकवून आहेत. हिंदी टेलिव्हिजन, सिनेमाद्वारा ते रसिकांच्या भेटीला येतात. लवकरच 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातून बीग बी आणि आमिर खान ही जोडी पहायला मिळणार आहे.