असा होता बिग बींचा लॉकडाऊनचा काळ
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण
मुंबई : शनिवारी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर एकच खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत.
बिग बी यांना कोरोनाची लागण कशी झाली? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. अनेकदा अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असायचे. लॉकडाऊनमध्ये बिग बी नेमक काय करायचे हा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता.
असा होता बिग बींचा लॉकडाऊन काळ
अभिषेक बच्चन यांची ऍमेझॉन प्राईमवर 'ब्रिद : इन टू शॅडोज' नावाची वेबसिरीज रिलीज झाली. या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत स्वतः अभिषेक बच्चन याने ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसापूर्वीच अभिनेता
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघेही लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर अडकले होते. जया बच्चन या खासदार आहेत आणि त्या संसदेच्या कामाकरता दिल्लीत होत्या. तिथेच्या त्या अडकल्या तर अमिताभ बच्चन हे सिनेमाच्या शुटिंग निमित्त घराबाहेर होते. पण लॉकडाऊनमधील नियम थोडे शिथिल झाल्यावर हे दोघेही घरी आले. जया बच्चन यांच वय ७२ आहे तर बिग बींच ७८.
दोघेही घरी आल्यानंतर त्यांची मुलगी श्वेता बच्चन देखील आपल्या मुलांसह तिथेच होती. नाव्या श्वेताची मुलगी परदेशात शिकायला होती पण ती देखील मुंबईत आली. त्यामुळे तीन नातवंडांसह जया बच्चन आणि अमिताभ बच्चन आपला वेळ घालवत होते.
मुलाखतीत अभिषेक बच्चन सांगतो की, आयुष्यात पहिल्यांदा आम्ही सगळे इतके दिवस एकत्र आहोत. कुटुंबात सगळे एकत्र राहत असलो तरीही चौघांची काम सिनेमाशी निगडीत आहेत. त्यामुळे अनेकदा घराबाहेरच राहणं व्हायचं. पण या लॉकडाऊनच्या काळात घरात राहणं शक्य झालं आहे.
तसेच अमिताभ बच्चन वेळेचे खूप सक्त आहेत. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग ते करत होते. अनेक पुस्तकांच वाचन करत होते. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील गोष्टी पाहिल्या जात होत्या. नातवंड घरात असल्यामुळे त्यांच्यासाठी काही गोष्टी खास बिग बी करत होते.
असं असताना आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नानावटी रुग्णालयात अमिताभ यांना दाखल केलं आहे. 'जलसा' हे बच्चन यांच घर सॅनिटाईज केलं आहे. तसेच घराबाहेर कन्टेन्मेंट झोनचं बॅनर देखील लावलं आहे.