मुंबई : संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बिग बींना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अभिषेक बच्चनला देखील कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी तीन दिवसांपूर्वीच कोरोनाच्या या संकटात मनोबल वाढवण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ये मुश्किल वक्त गुजर जाएगा. मौत हार जाएगी और जिंदगी जीत जाएगी, असं म्हणतं त्यांनी ८ जुलै रोजी देशाला हिम्मत देणारी आपल्या आवाजातील एक कविता पोस्ट केली होती. (अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती) 



तसेच त्यांनी एक जाहिरात देखील पोस्ट केली होती. ज्यामध्ये सांगण्यात येतंय की, Covid-19 मुळे खूप काम स्वतःची स्वतःला करायला लागत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, तसंच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राजेश टोपे म्हणाले. तसंच बच्चन कुटुंबातल्या इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. #Breaking: अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात दाखल


दुसरीकडे अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. शनिवारी सकाळी माझे आणि वडिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आम्हा दोघांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव



याबद्दल आम्ही संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे, तसंच आमचं कुटुंब आणि आमच्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. सगळ्यांनी शांत राहा, घाबरून जाऊ नका, असं अभिषेक बच्चन म्हणाला आहे.