मुंबई : सैराटच्या यशानंतर आता नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आणि नागराजने थेट बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना प्रमुख भूमिकेत घेतलं आहे. नागराज मंजुळेचा 'झुंड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षापासून या सिनेमाच्या शुटिंगमध्ये अनेक अडथळे येत असल्याचं आपण वेगवेगळ्या बातम्यांमधून वाचलं. हा सिनेमा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकावर आधारित आहे. विजय बरसे असं या परिक्षकाचं नाव असून ही भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत. अखेर या सिनेमाचं शुटिंग नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. 



महाराष्ट्रात होणार सिनेमाचं शुटिंग नागराजने आतापर्यंत 'फँड्री' 'सैराट' सिनेमांत महाराष्ट्राची वेगळी बाजू दाखवली आहे. त्याच्या दोन्ही सिनेमाच्या शुटिंगनंतर महाराष्ट्रातील तो तो परिसर अतिशय लोकप्रिय झाला. आताही तसंच होणार आहे कारण नागराजचा 'झुंड' या सिनेमाच शुटिंग देखील महाराष्ट्रातील नागपूरमध्ये होणार आहे. नागपूरमध्ये 80 हून अधिक दिवसांच शुटिंग असणार आहे. त्यामधील 45 दिवस नागपूरमध्ये बिग बी शुटिंग करणार आहेत.