Amitabh Bachchan Twitter Blue Tick Removed Shares Post : काही दिवसांपूर्वीचं ट्विटरचे सगळे मालकी हक्क हे एलॉन मस्ककडे गेल्यापासून त्यावर अनेक बदल हे होऊ लागले होते. कधी प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगा आपण पाहिला, तर कधी सब्सक्रिप्शन असेल तरच अधिकृत अकाऊंट आहे हे कळण्यासाठी मिळणारी ब्लू टीक अशी घोषणा. एलॉन मस्कनं ट्विटरवर अनेक बदल केले आहेत. दरम्यान, अचानक अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि राजकारणींची ब्लू टिक काढलं आहे. त्यावर अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. अशात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी तर पोस्ट शेअर करत या प्रकरणी त्यांनी पैसे देऊनही ब्लू टिक काढल्याचं सांगितलं आहे. त्यासोबत अमिताभ यांनी शेअर केलेली ही भन्नाट पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. यावेळी अमिताभ म्हणाले, 'ए twitter भइया  ! सुन रहे हैं  ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम ...  तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ  तो वापस लगाय दें भैया  , ताकि लोग जान जायें की हम ही हैं  - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम  ।  अब का, गोड़वा  जोड़े पड़ी  का  ??'  अमिताभ यांनी केलेल्या या ट्वीटनं सगळ्यांना हसू अनावर झाले आहे. अनेकांनी अमिताभ यांच्या या ट्वीटवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. 



एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, चिड़िया उड़ी फुर्र. दुसरा नेटकरी म्हणाला, सर 3-4 दिवसात येईल. तिसरा नेटकरी म्हणाला, आम्हाला माहितीये की तुम्ही तुम्हीच आहात. आणखी एक नेटकरी म्हणाला, सर आता तुम्हाला निळ्या रंगाची टीक मिळणार नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, सब्र का फल Blue Tick होता है. तिसरा नेटकरी म्हणाला, आपके पास क्या है हमारे पास ब्लू टिक है. आणखी एक नेटकरी म्हणाला, बच्चन जी काय करायचं, एलॉन मस्कचं काय करायचं बोला. 


हेही वाचा : नाईट सूटवर 'इतक्या' हजारांची चप्पल! Isha Ambani च्या लूकनं वेधलं लक्ष


बॉलिवूड कलाकारांमध्ये फक्त अमिताभ नाही तर त्यांच्यासोबत शाहरुख खान,सलमान खान, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, रवि किशन, सोफी चौधरी, सारखे अनेक कलाकारा आहेत. तर त्यांच्या व्यतिरिक्त खेळाडूंविषयी बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी यांच्या सारख्या अनेक खेळाडूंच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक काढण्यात आलं आहे.