जेव्हा ऐश्वर्यासाठी अमिताभ यांच्या डोळ्यात आलं पाणी, तो क्षण ते कधीच विसरु शकत नाहीत
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न हे त्या काळातील सगळ्यात चर्चित लग्नांपैकी एक होतं.
मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न हे त्या काळातील सगळ्यात चर्चित लग्नांपैकी एक होतं. जगातील सगळ्यात सुंदर महिलांपैकी एक आहे आणि ही प्रतिभावान अभिनेत्री बच्चन कुटुंबाची सून होणार होती. जया बच्चन याबद्दल खूप आनंदी होत्या आणि त्यांनी पुरस्कार सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. तर दुसरीकडे, जरी अमिताभ बच्चन आपल्या सूनेबद्दल इतके उघडपणे बोलताना दिसत नसले तरी, पण ते आपल्या सुनेशी किती अटॅच आहेत याचं उदाहरण ऐश्वर्याला बघितल्यावर भावनिक होण्यापासून रोखू शकलं नाही. हा असा एक क्षण होता, जो सासऱ्याचा आपल्या सूनेप्रती असलेला स्नेह दर्शवतो.
कोविड महामारीमुळे अमिताभ आणि त्यांची सून आणि नातही याला बळी पडले होते. यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बिग बी यांच्या चिंतेत ऐश्वर्या आणि तिचं कुंटुंब किती चिंतेत होतं हे तिच्या पोस्टवरून दिसून आलं.
ऐश्वर्या आणि आराध्या यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावनंतर घरी परत आल्यावर, अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि त्याबद्दल सर्वांना माहिती दिली आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जेव्हा माझी लहान नात आणि सून यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं तेव्हा मी माझे आनंदाश्रू थांबवू शकलो नाही. देवा, तुझी आमच्यावरची कृपा अफाट, अतुलनीय आहे'. या भावनिक पोस्टमुळे हे समजलं की हा मेगास्टार त्याच्या नातवंडांना आणि सूनेचे किती लाड करतो.
प्रत्येक स्त्रीला आशा असते की, लग्नानंतर तिला असं गोड सासरं मिळावं, जे तिच्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करतील. सासरे आपल्या सूनेसाठी एक मजबूत स्तंभासारखे असतात, ज्यामुळे तिला नवीन कुटुंबात मिसळण्यासाठी बळ मिळतं. आवश्यकतेनुसार स्वतःच्या पत्नीसमोर सुनेचा बचाव करण्यासही ते मागे हटत नाही. हेच कारण आहे की अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे स्त्री तिच्या सासूपेक्षा सासऱ्याशी भावनिकरित्या जोडलेली असते. आणि कदाचित ऐश्वर्या आणि अमिताभ यांचं नातंही या यादीत येतं असेल असं म्हणण्यात काहीच हरकत नाही.