टी.व्हीवर आता नाही दिसणार अमिताभ बच्चन
ते आता दररोज टी.व्हीवर दिसणार नाहीत. त्यांच्या वापसीसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपती' च्या डाय हार्ट चाहत्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी अशी की, बिग बीने रविवारी 'कौन बनेगा' शोच्या शेवटच्या भागाची शूटिंग पूर्ण केली आहे आणि चांगली बातमी अशी आहे की हे सुपरहिरो काही महिन्यांनंतर टीव्हीवर परत येऊ शकतात.
लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती ९ मधील ८ सिझन होस्ट करणाऱ्या अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले की, ते आता दररोज टी.व्हीवर दिसणार नाहीत.
त्यांच्या वापसीसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, ' ... शो का आखिरी दिन...बेहद दुख के साथ.' सिझनशी जोडले गेलेले सर्व लोक, प्रोडक्शन आणि ब्रॉडकास्टिंग टीम दु: खी आहे. पण आज आम्ही शुटींग संपविली आहे.
गेल्या महिन्यापासून केबीसीसाठी सलग आणि जास्त बोलल्याने माझ्या वोकल कॉड्समध्ये इन्फेक्शन झाल्याने गिळण्यास समस्या निर्माण झाली आहे. अँटीबायोटिक आणि पॅन किलरच्या मदतीने मी एपिसोड पूर्ण करु शकलो आहे.'' असे बीग बी यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.
केबीसी लवकर संपल्याचे दु: ख त्यांनी व्यक्त करत काही महिन्यांनी मी पुन्हा परतेन असे आश्वासनही प्रेक्षकांना दिले. तब्येत ठिक झाल्यावर ते यावर विचार करणार आहेत.असा शानदार शो बनविल्याबद्दल त्यांनी केबीसीच्या निर्मात्यांना धन्यवादही दिले.
केबीसीच्या जागी आता तीन नवे शो पाहायला मिळणार आहेत. 'पहरेदार पिया की' मालिकेचा सिक्वेल,जावेद खानचा नवा शो ' 'रिश्ते लिखेंगे हम नए' आणि रोमॅंटिक हॉरर शो 'एक दिवाना था' हे शो सोनी टीव्हीवर पाहायला मिळणार आहेत.