मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्रेयेथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आत्महत्येची बातमी समोर येताच कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  त्याच्या अशा अचानक जाण्याने  चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याच्यावर विलेपार्ल्याच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आहेत. त्याच्या निधनावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का सुशांत सिंह राजपूत तू असं का केलस? ब्लॉगच्या सुरवातीलाच बिग बींनी सुशांतला हा असा भावूक प्रश्न विचारला पुढे त्यांनी लिहिलं आहे की, 'का तू स्वतःला संपवलं.. तुझं कौशल्य.. तुझी बुद्धीमत्ता अत्यंत अफाट होती. तू दमदार कलाकार होतास. काहीच न बोलता मागता तू असा निघून गेलास.' असं भावूक भावना त्यांनी सुशांत प्रती व्यक्त केल्या. 



शिवाय त्यांनी ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील सुशांतच्या कामाचा देखील उल्लेख केला आहे. 'मी ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील धोनीचं काम पूर्ण पाहिलं होतं.  मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा इंटरनॅशनल टुर्नामेंटमधला धोनीचा तो षटकार हुबेहूब कसा मारला याबद्दल कुतूहलतेने विचारलं. '


त्यावर सुशांत म्हणाला की, मी धोनीचा तो व्हिडिओ १०० वेळा पाहिला होता. तो त्याच्या कामा प्रती एकनिष्ठ होता. सर्व काही मिळवल्यानंतर असा विचार मनात कसा येतो. आयुष्याला असं संपवण्याचा अधिकार कोणालाच नाही... असं बिग बी ब्लॉगच्या अखेरीस म्हणाले.