मुंबई : जीवनाच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला असं वाटतं की आपणं सर्वांना आनंद दिला पाहिजे. मात्र बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन म्हणतात, असं काही केलं पाहीजे जे केल्याने आपल्याला आनंद मिळेल. बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम त्यांच्या चाहत्यांना उत्तम संदेश देत असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही सातासमुद्रा पार देखील आहे. त्यामुळे त्यांचे विचार जाणून घेणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बिग बींनी आरशात पाहत असतात एक फोटो शेअर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करत त्यांनी कप्शनमध्ये, 'रोज सकाळी स्वतःचाच सामना करणारे आपण एकमात्र व्यक्ती आहोत. जेव्हा तरूण वयात असतो तेव्हा वाटतं संपूर्ण जगाला आपल्याला खूश ठेवायचे आहे. पण नाही... असं काही करा ज्याने तुम्हला आनंद समाधान मिळेल. असं आयुष्य केलं पाहिजे जे आपल्याला जगायचं आहे. जर तुम्ही असं करत असाल तर प्रत्येक सकाळ ही नवी प्रेरणा देणीरी असेल. ' असं त्यांनी लिहिलं आहे.  



बिग बींनी शेअर केलेला फोटो हा 'कौन बनेगा करोड़पती'च्या सेट वरील आहे. त्यांनी मांडलेले हे विचार सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शिवाय चाहते देखील चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.  
 
बिग बी कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. महत्त्वाची गोष्टी आजही त्यांच्या चाहता वर्गात घट न होता सतत वाढ होत असते.