मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या संवाद कैशल्याने आणि अभिनयाने सिनेविश्वात एक वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यांनी 1969 साली 'सात हिंदूस्तानी' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजही त्यांचे चित्रपट, चित्रपटातील गाणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. शिवाय अमिताभ आणि जया यांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगत असतात. अता जया यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. 'लाईफ ओके' पुरस्कार सोहळ्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. पुरस्कार घेतल्यानंतर अमिताभ बच्चन खाली उतरतात. तेव्हा 'अरे दिवानो मुझे फेहचानो..' हे गाणं सुरू आहे. जेव्हा जया बिग बींना शुभेच्छा देतात, तेव्हा दोघे एकमेकांना किय करताना दिसतात. त्यांनी किस केल्यानंतर अभिषेक हैरान होवून जातो आणि बिग बी त्याला देखील किस करतात.