Amitabh - Jaya Bachchan यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण, लेकीनं सांगितलं यशस्वी नात्याचं रहस्य
Amitabh - Jaya Bachchan Celebrate 50th Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या यशस्वी लग्नाचं रहस्य तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का? लेक श्वेतानेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा
Amitabh - Jaya Bachchan Celebrate 50th Wedding Anniversary : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. त्यांच्या लग्नाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1973 साली लग्न बंधनात अडकलेल्या अमिताभ आणि जया बच्चन यांनी एकत्र 50 वर्षे पूर्ण केली आहेत. जया बच्चन या त्या काळातील सुपरस्टार होत्या, तर अमिताभ बच्चन हे त्या काळात करिअरमध्ये स्ट्रगल करत होते. ते दोघं कसे भेटले आणि त्यांनी एकत्र इतकी वर्षे आनंदानं कशी घालवलीत हे जाणून घेऊया. इतकंच काय तर त्यांची लेक श्वेतानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न टिकवू ठेवण्यासाठी त्याचं सिक्रेट सांगितलं आहे.
अमिताभ आणि जया यांची पहिली भेट ही 'बंसी बिरजू' या चित्रपटात सहकलाकार होते. पण अमिताभ आणि जया हे जवळ येण्याचं कारण ठरला 1971 साली प्रदर्शित झालेला गुड्डी हा चित्रपट. त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी 'एक नजर' या चित्रपटात काम केलं. बावर्ची या चित्रपटानंतर तर ते इतक्या जवळ आले की त्यांनी 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जंजीर' या चित्रपटानंतर त्या दोघांनी लग्न बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला.
वडील अमिताभ आणि आई जया बच्चन यांच्या लग्नाचा 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लेक श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत श्वेतानं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ आणि जया एकत्र दिसत असून हा एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो आहे. त्यांच्या या फोटोला शेअर करत श्वेता कॅप्शनमध्ये म्हणाली की लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही गोल्डन झालं आहेत. एकदा त्यांना विचारण्यात आलं होतं की यशस्वी वैवाहिक जीवनाचं रहस्य काय आहे. त्यावर उत्तर देत आई म्हणाली होती की प्रेम आणि मला वाटतं बाबा म्हणाले होते की पत्नी ही नेहमीच योग्य असते. छोट्या शब्दात त्यांनी असं उत्तर दिलं. श्वेतानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
हेही वाचा : "मेडल्स देशाची आहेत… मग...", Wrestlers Protest वर आस्ताद काळेचे खडे बोल
दरम्यान, जया बच्चन आणि अमिताभ लग्न बंधनात अडकण्याचं कारण हे जंजीर या टीमला मिळालेलं यश आहे. त्यावेळी संपूर्ण टीमनं निर्णय घेतला की परदेशात फिरायला जायचं. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा त्यांनी अमिताभ आणि जया यांना लग्न केलत तर जाता येईल असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी लगेच लग्न केलं.