Aastad Kale Post for Wrestlers Protest : महिनाभरापासून कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची सुरुवात ही दिल्लीतील जंतर मंतर मैदानातून सुरु झाली. त्यानंतर 28 मे रोजी त्यांना या मैदानातून हटवण्यात आलं. अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आणि काही काळानंतर त्यांना सोडलं. कोणाचाही पाठिंबा मिळत नसल्याचे पाहत कुस्तीपटू यांनी निर्णय घेतला होता की त्यांचे आतापर्यंत सगळी पदक ही गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. हरिद्वार या ठिकाणी हे सगळे गेलेही होते. त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या सगळ्यावर प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर संपात व्यक्त करत आहेत. अशात काही सेलिब्रिटी पुढे येऊन त्यावर त्यांचा संताप व्यक्त करत आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेता आस्ताद काळेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर संताप व्यक्त केला आहे.
आस्ताद काळेनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत आस्ताद म्हणाला, "मेडल्स देशाची आहेत”… मग ती जिंकणारे खेळाडू कोणाचे आहेत रे भाड**??" असं कॅप्शन दिलं आहे. आस्तादनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आस्तादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, "बातम्या वाचल्या. तीन वेगवेगळ्या ठिकाणी. पण एकुणात ते खेळाडू बेवारशासारखेच वागवले जातायत हे ठाम मत आहेच." तर दुसरा नेटकरी म्हणाला, "मेडल्स देशाची आहेत हे मान्य पन ती रस्त्यावर पडली होती आणि कोणालातरी सापडली असे नाही ती मेडल्स त्या मुलीनी कमावलेली आहेत हे कोणीही विसरू नये. त्या दोषी की समोरील व्यक्ती दोषी याचा निर्णय होईलच पन म्हणून त्यांच्या मेडल्स बाबतीत असे बोलू नये." तिसरा नेटकरी म्हणाला, "पोलीस तक्रार करून सुद्धा काही झालं नाही. उलट अयोध्येतील लोकांना एकत्र करून शक्तिप्रदर्शन करताहेत." आणखी एक नेटकरी म्हणाला, "संविधानावर विश्वास आहे का खाप पंचायतीवर ?" नेटकऱ्यांनी अशा विविध प्रतिक्रिया आस्तादच्या पोस्टवर केल्या आहेत.
हेही वाचा : देशमुख - खान कुटुंबात इतकं खास नातं? अर्पितानं साजरा केला Riteish च्या मुलाचा वाढदिवस
23 एप्रिलपासून कुस्तीपटू हे आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात दिल्लीत कुस्तीपटूंकडून आंदोलन सुरू आहे. 29 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. तेव्हा कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या सगळ्या कुस्तीगीरांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला.