मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा पद्यावरील दबदबा आजही कायम आहे. त्यांचा आवाज, अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. याचं श्रेय आहे त्यांच्या कामावरील निष्ठेला.


या चित्रपटात व्यस्त अमिताभजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या ७५ ओलांडल्यानंतरही ते तितक्याच ताकदीने आपली भूमिका वठवतात. त्यामुळेच की काय आजही निर्माते-दिग्दर्शक बीग बींसोबत चित्रपट करण्यासाठी तयार असतात. सध्या बीग बी आमिर खानसोबतच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्ता' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय ते '102 नॉट आऊट' या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासह झळकणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळा दिग्दर्शक नागराज मुंजळेसह चित्रपट करणार आहेत.


नागराजच्या चित्रपटात बीग बी


नागराजच्या सैराटने मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडलाही वेड लावले. या चित्रपटामुळे नागराजचे सर्वच स्तरातून कौतूक झाले. बीग बींनी ही सैराट आणि नागराजचे तोंडभरून कौतूक केले. आता अमिताभ यांच्यासह काम करण्याचे स्वप्न झुंड या चित्रपटाद्वारे पूर्ण होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईल. नागराजचा झुंड हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यात बीग बी असल्यामुळे हा नागराजच्या आयुष्यातील आणि करिअरमधील महत्त्वाचा टप्पा असेल, असे म्हणायला हरकत नाही.