मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे. कतरिना कैफ-विकी कौशल, राजकुमार राव-पत्रलेखा आणि फरहान अख्तर-शिबानी दांडेकर या कलाकारांनी सात फेरे घेऊन लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर आता आणखी एका स्टारच्या लग्नाच्या फोटोने सगळ्यांनाच हैराण केलं आहे. आम्ही बोलतोय अभिनेत्री अमृता रावबद्दल. अमृताने तिच्या आणि आरजे अनमोलच्या लग्नाचा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. हा फोटो लेटेस्ट नसला तरी तिने आपल्या लग्नाबाबत एक मजेदार गुपित उघड केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता रावने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. फोटोत अमृता मराठी नववधू बनल्याचं दिसत आहे. तर आरजे अनमोल देखील पारंपारिक वराच्या पेहरावात दिसत आहे. फोटो शेअर करत अमृताने लिहिलंय की, 'एपिसोड विवाह इज आउट, लिंक इन बायो'. जरी, अमृताने हा फोटो आता शेअर केला असला तरी तो फोटो खूप जुना आहे.


 अलीकडेच एका शोदरम्यान अमृताने खुलासा केला होता की, तिने २०१६ मध्ये आरजे अनमोलसोबत गुपचूप लग्न केलं होतं. जेव्हा अभिनेत्री आरजे अनमोलच्या रेडिओ शोमध्ये तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली तेव्हाच या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.



शोमध्येच दोघं मित्र झाले आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2016 मध्ये अमृता आणि अनमोलचं लग्न झालं. 2020 मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला ज्याचं नाव वीर आहे. या दोघांनी पुण्यातील इस्कॉन मंदिरात लग्न केलं. जिथे फक्त कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. अमृताबरोबरच  जरी सर्वांनी हे लग्न गुप्त ठेवलं असलं तरी. मात्र, आता सोशल मीडियावर अमृताने तिच्या लग्नाचा फोटो शेअर केले आहेत.