मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने 1991 मध्ये चित्रपटसृष्टीत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्याचवेळी अमृता सिंग 80 च्या दशकापासून बॉलिवूडवर राज्य करत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री 9 फेब्रुवारी रोजी तिचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता अनेक कारणांमुळे चर्चेत असते. वयाने कमी असलेल्या सैफ अली खानसोबतच्या लव्ह लाईफपासून लग्नापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. अमृताचे आयुष्य रोलर-कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हते. 


अवघ्या तीन महिन्यांच्या डेटिंगमध्ये अमृताने 20 वर्षीय सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत अमृताने तिच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगितले. 


सैफ काजोलसोबत डेब्यू करणार होता. सैफ अली खान राहुल रवैलच्या 'बेखुदी' चित्रपटातून डेब्यू करणार होता. 


या चित्रपटातून काजोलही फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत होती, पण सैफच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे तिची या चित्रपटातून जागा घेतली गेली. 


याच काळात सैफ आणि अमृता सिंग यांची पहिली भेट झाली होती. दोघेही फोटोशूटसाठी एकत्र आले होते, जिथे त्यांची मैत्री झाली. 


शूट संपल्यानंतर लगेचच सैफने अमृताला जेवायला जाण्यास सांगितले. अमृताने नकार देत त्याला आपल्या घरी बोलावले. 


जेवणानंतर दोघांनी एकमेकांना किस केले आणि आय लव्ह यू म्हणाले. दोघे एकाच घरात, पण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकत्र राहू लागले. सैफने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी अमृताचे घर खूप दिवस सोडले नाही. नंतर ते दोघेही एक जोडपे म्हणून सार्वजनिकपणे स्पॉट होऊ लागले...


एक दिवस सैफला शूटसाठी बाहेर जावं लागलं. त्यावेळी अभिनेत्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत सैफने अमृताला 100 रुपये उधार देण्यास सांगितले. 


अमृतानं सैफला कार घेऊन जाण्यास सांगितलं, पण सैफने सांगितले की, त्याच्यासाठी प्रोडक्शन वाहन पाठवले आहे. या निमित्तानं ती सैफला पुन्हा भेटू शकेल, असा विचार करून अमृता हे बोलली होती.