सैफ आणि अमृताचा या दोन कारणांमुळे घटस्फोट?...तुमच्याही संसारात घडतायत का `या` गोष्टी?
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा 2004 साली घटस्फोट झाला, सैफ आता करिनासोबत लग्न करून संसारात रमला आहे मात्र अमृताने कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
मुंबईः अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचे नातं जितक्या लवकर जुळलं तसंच ते तुटायलाही फार वेळ लागला नाही. पहिल्या दोन भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या अमृता आणि सैफने पहिल्या 6 महिन्यातच लग्न करायचं ठरवलं होतं आणि ते पूर्ण केलं. कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न केलं.
अमृता-सैफचा हा प्रेमविवाह होता ज्याला पतौडी कुटुंबीय सहमत नव्हते. मात्र दोघांनी गुपचूप लग्न केल्याने कोणीही काही करू शकत नव्हते. 1991 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात लवकरच चढ-उतार येऊ लागले.
लग्नाला काही वर्ष झाले होते की त्यांच्या भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. हळुहळु वाद अधिक वाढू लागला, दुरावा सुरु झाला आणि नंतर काही वर्षे उलटून गेल्यावर दोघेही वेगळे राहू लागले. वेगळे राहिल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होण्याऐवजी वाढले आणि अखेर दोघांनीही कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
एवढं प्रेम असताना नात्यात कटुता येण्याचं कारण काय असा प्रश्न पडतो. यामागे मीडिया वेगवेगळी कारणे सांगत असला तरी त्यांच्या विभक्त होण्यामागे दोन खास कारणे होती. पहिले कारण होते वयाचे अंतर. सैफ अली खान आणि अमृताच्या वयात खूप अंतर आहे.
अमृता सैफपेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. लग्नावेळी सैफ फक्त 21 वर्षांचा होता, तर अमृताने वयाचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद आणि मनभेद होणं साहजिकच होतं आणि दुसरे कारण म्हणजे लग्नानंतर अमृताने आपल्या करिअरला अलविदा केल्याचं.
अमृताचे लग्न झाले तेव्हा ती सुपरस्टार होती, तर सैफचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. पण करिअरच्या या टप्प्यावर अमृताने लग्न केलं आणि घर सांभाळण्यासाठी करिअर पणाला लावलं. ही गोष्ट हळुहळू अमृता आणि सैफ दोघांनाही खटकायला लागली आणि त्यातूनच दोघांमध्ये अंतर वाढत गेलं आणि अखेर दोघांचा घटस्फोट झाला