मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान असा अभिनेता आहे ज्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. अमृता सिंगने सैफच्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाच्या रुपात प्रवेश केला होता. जेव्हा अभिनेता फक्त 20 वर्षांचा होता. एका चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली, त्यानंतर भेटींचा फेरा सुरू झाला आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. त्यामुळेच दोघांनीही आपलं नातं घरच्यांशी लपवून गुपचूप लग्न केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती मिळाली तेव्हा बराच गोंधळ झाला होता. मात्र नंतर त्यांच्याकडे त्यांचं नातं स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. यानंतर सैफ-अमृता त्यांचं आयुष्य आनंदानं जगू लागले आणि मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान यांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आनंद आला.


सगळं काही अनेक वर्ष एकदम छान चाललं होतं.  पण नंतर सैफ-अमृता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अखेर दोघांनी 2004 मध्ये घटस्फोट घेऊन परस्पर संमतीने 13 वर्षे जुनं नाते संपवलं. घटस्फोटानंतर इटालियन मॉडेल रोजा सैफच्या आयुष्यात आली. दोघंही काही काळ लिव्ह-इनमध्ये होते पण नंतर त्यांचंही ब्रेकअप  झालं.


रोजासोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरने सैफच्या आयुष्यात प्रवेश केला. टशन चित्रपटाच्या सेटवर दोघं जवळ आले. हळूहळू त्यांची जवळीक रंगली आणि मग ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं पण सैफसोबत लग्न केल्यानंतर अमृताने दुसरं लग्न केलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमृताने फक्त तिची मुलं सारा आणि इब्राहिमवर लक्ष केंद्रित केलं होतं, ज्यामुळे ती दुस-या लग्नाचा विचार करू शकत नव्हती. तिच्यासाठी मुलं हीच तिचं  जग बनले.