Amrita Singh on Raveena Tandon and Saif Ali Khan's Rumoured Affair : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही तिच्या कामासोबत तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिच्या आणि अक्षय कुमारच्या नात्याची आजही चर्चा होते. रवीनाचं नाव फक्त अक्षय कुमारसोबत जोडण्यात आलं असं नाही. तिचं नाव आणखी काही कलाकारांसोबत जोडण्यातं आलं होतं. मात्र, खूप कमी लोकांना माहित असेल की कधीकाळी रवीनाचं नाव हे सैफ अली खानसोबत जोडण्यात आलं होतं आणि ते देखील तेव्हा जेव्हा सैफ हा विवाहित होता. त्यानंतर जेव्हा अमृताच्या कानावर सैफ आणि रवीनाच्या अफेअरच्या चर्चांची बातमी कळली तेव्हा ती खूप चिडली होती. दरम्यान, रवीना आणि सैफ अली खाच्या कथितपणे असलेल्या अफेअरच्या चर्चांवर अमृताची प्रतिक्रिया दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीना आणि सैफ अली खाननं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यात 'मैं खिलाडी तू अनाडी', 'कीमत', 'परंपरा', 'इम्तिहान' आणि 'पहला नशा' हे चित्रपट आहेत. एकत्र इतक्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांचं नाव जोडणं किंवा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगणं हे सहाजिक होतं. पण या सगळ्या अफवा अमृतापर्यंत पोहोचल्या. जेव्हा अमृताला याविषयी कळालं, तेव्हा ती खूप संतापली होती. तर त्यावेळी म्हणजेच 90 च्या दशकात 'सिनेब्लिट्ज' नावाची एक मॅगझिन होती. त्या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रवीनानं संताप व्यक्त केला आहे आणि इतकंच नाही तर शिवीगाळ देखील दिल्या होत्या.


अमृताची संतप्त प्रतिक्रिया...


अमृतानं म्हटलं होतं की 'रवीना ही खूप फटकळ आणि चिडचिड करणारी आहे. तिच्यात आणि माझ्यात जी मैत्री होती ती आता राहिली नाही. माझा नवरा सैफ आणि रवीनाचं अफेयर... तुम्ही खरंच यावर विश्वास ठेवता? माझं तर हेच म्हणणं आहे की सैफ जास्त हुशार आणि बुद्धिमान आहे. रवीना टंडनपेक्षा जास्त सैफची टेस्ट चांगली आहे.' 


हेही वाचा : VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं...


अमृतानं पुढे सांगितलं की 'जेव्हा आम्ही नाशिकमध्ये एकत्र होतो, तर रवीना माझ्याशी काहीही बोलली नाही. जर कोणी मला शुभेच्छा द्यायच्या नाही, जर कोणाला बोलायचं नसेल, तर ती तिची समस्या आहे. असं असेल तर माझ्याकडून काही अपेक्षा ठेवायच्या नाही की मी माझी हद्द सोडून रवीना सारख्या लोकांशी बोलेन. जर मला आणि रवीनाला एका कॅटेगरिमध्ये ठेवलं तर मला खूप वाईट वाटेल.'