Amruta Deshmukh Mehendi: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाची. बिग बॉसमध्ये एकमेकांशी टक्कर देणारे हे दोघंही कलाकार पाहता पाहता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता लवकरच त्यांचा लग्नसोहळा पार होणार होतो आहे. उद्या त्यांचा विवाहसोहळा संपन्न होतो आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. अमृता देशमुखनं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून ग्रहमखाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यामुळेही त्यांच विशेष चर्चा होती. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. बिग बॉसचं पर्व संपलं आणि त्यांच्या अफेअरची जोरात चर्चा पिकायला लागली होती. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृतानं आपल्या मेहेंदीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. अमृतानं तब्बल 4 तास प्रसादच्या नावाची मेहेंदी काढली आहे. यावेळी तिची मेहेंदीही खूपच सुंदर दिसते आहे. प्रसादनंही अमृतासाठी खास मेहेंदी काढली आहे. यावेळी प्रसादनं आपल्या हातावर लिहिलंय की अमृतमय झाहलो. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावेळी आपल्या हातावर अमृतानं बिग बॉसचा डोळा काढला आहे आणि सोबतच तिनं तिचा आणि प्रसादचा फोटोही शेअर केला आहे.


ज्यात ते दोघं नवरा आणि नवरीच्या वेशात आहेत. मेहंदीवरील या डिझाईननं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिनं सुंदर असा फुलांचा हार आणि बांगड्या घातल्या होत्या. सोबत येल्लो कलरचा ट्रेडिशनल लेहेंगा आणि चोळी परिधान केली होती. प्रसादनंही पांढऱ्या रंगाचा कुर्ता शेअर केला आहे. 


हेही वाचा : 'शोले'तील सांबाच्या मुली बॉलिवूड हिरोईनपेक्षाही कमी नाहीत, पाहून कॅटची पण जाईल विकेट



यावेळी चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवरती नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता त्यांच्या मेहेंदी आणि हळदीचेही फोटो हे व्हायरल झाले आहेत. आता उद्या त्यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाचीही उत्सुकता लागून राहिली आहे. प्रसाद आणि अमृता हे दोघंही लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार आहेत. तुम्हीही त्यांच्या हळदी आणि मेहंदीमधील कोणता लुक आवडला आहे.