'शोले'तील सांबाच्या मुली बॉलिवूड हिरोईनपेक्षाही कमी नाहीत, पाहून कॅटची पण जाईल विकेट

Mac Mohan aka Samba: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सांंबाच्या मुलींची. 'शोले' चित्रपटातील सांबा हे पात्र आपल्या सर्वाच्याच आवडीचे आहे. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली असते. परंतु सध्या त्यांच्या मुलींचीही बरीच चर्चा ही रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 17, 2023, 03:56 PM IST
'शोले'तील सांबाच्या मुली बॉलिवूड हिरोईनपेक्षाही कमी नाहीत, पाहून कॅटची पण जाईल विकेट title=
mac mohan aka samba daughters looks like a bollywood actresses

Mac Mohan aka Samba: 'शोले' हा चित्रपट आपल्यापैंकी अनेकांनी पाहिला आहे. या चित्रपटातील हरएक पात्रं हे आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे. त्यातील सांबाचे पात्रं तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात असेलच. सांबाची व्यक्तिरेखा करणारे अभिनेते मॅक मोहन हे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. परंतु तुम्ही त्यांच्या लेकींना कधी पाहिले आहे का? त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. मॅक मोहन यांना तीन मुलं आहेत. त्यातील दोन मुली आणि एक मुलगा आहे. 

मंजारी माकीजानी आणि विनाती माकीजानी अशा दोन मुली आणि विक्रांत माकीजानी असं त्यांच्या मुलाचे नावं आहे. 2010 साली मॅक मोहन यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या अभिनयाची आठवण आजही अनेकांना आल्यावाचून राहत नाही. त्यांच्या दोन्ही मुली या बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवतील अशा आहेत. सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय आहेत. त्यांच्या फोटोंचीही बरीच चर्चा रंगलेली असते. 

त्या दोघी या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा असते. त्या दोघी बॉलिवूडमध्ये फारश्या सक्रिय नसल्या तरीसुद्धा त्या कुठल्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत. यावेळी त्यांचे फॅन्स हे त्यांच्या फोटोंवरती अनेकदा कमेंट्सही करताना दिसतात. त्यांच्या फोटोवरती अनेक जण कमेंट करतात की तुम्ही तर बॉलिवूडमध्ये असायला पाहिजे. त्या तर सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना मात देत आहेत. अशा अनेक स्टारकीड्स आहेत ज्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. परंतु ते फारसे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतात. त्यांच्या सौंदर्याकडे पाहून त्यांनी बॉलिवूडमध्ये असायला हवे होते अशी बरीच चर्चा असते. 

हेही वाचा : लेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली...

हे स्टारकीड्स अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यातून ते बऱ्याचदा विविध ठिकाणी स्पॉटही होतात. पापाराझींही त्यांच्या मागे मागे करत त्यांना टिपण्याचा प्रयत्न करतात. मॅक मोहन यांची मुलगी विनाती माकीजानी हिनं आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरून आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यांची सध्या बरीच चर्चा रंगलेली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांच्या या फोटोखाली अनेक जणं अशीच कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा आहे. त्यांचा फोटो पाहून तुम्हीही त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या सौंदर्याचे सर्वच जणं फॅन्स आहेत. त्या कधी मोठ्या चित्रपटातून दिसतील अशीही त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.