Ram Mandir News: राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  देशभरात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.  राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन गीत लाँच करण्यात आले आहे. या भजन गीतमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना साथ दिली आहे. 


'हे राम' नावाने भजन गीताचा Music Album लाँच करण्यात आला आहे. हे भजन अनेक ऑनलाईन music प्लॅटफॉर्मवर ऐकता ऐवू शकते. लवकरच याचा व्हिडिओ देखील लाँच केला जाणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी फोटो शेअर करत दिली आहे. 'हे राम' या भजन गीताचे पोस्टर लाँच झाले आहे. अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासह या पोस्टरचे फोटो शेअर केले आहेत. टीप्स कंपनीने हा  Music Album लाँच केला आहे. 


 ‘हे राम’ हे भजन गीत सुखद आनंदाची अनुभूती आहे. भारतातील राममय सोहळ्यात रामभक्तीपर भजन गीत गाण्याचे सौभाग्य मला मिळाले यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते असे पोस्ट अमृता फडणवीस यांनी शेअर केली आहे. 
अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांनी गायलेले 'शिव तांडव स्तोत्र' देखील चांगलेच लोकप्रिय झाले. 



अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जसजसा जवळ येतोय. तस तसं येथील वातावरण आणखी राममय होत चाललंय .अयोध्येमध्ये भजन- किर्तन आणि गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झालंय..अयोध्या नगरीचं वर्णन करणारी गीतं आणि प्रभू श्रीरामांबाबतची भजन-किर्तनं सादर करण्यात येत आहेत.


अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जसजसा जवळ येतोय. तस तसं येथील वातावरण आणखी राममय होत चाललंय. अयोध्येमध्ये भजन- किर्तन आणि गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झालंय. अयोध्या नगरीचं वर्णन करणारी गीतं आणि प्रभू श्रीरामांबाबतची भजन-किर्तनं सादर करण्यात येत आहेत.