मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लाँच झालंय. गणरायाच्या आगमनाकरता आपण सगळेच उत्सुक आहेत. याच बाप्पाच्या आगमनाकरता 'गणेश वंदना' हे गाणं रिलीज झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांनी हे गाणं आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या सगळ्या डॉक्टर्स आणि इतर स्टाफला समर्पित केलं आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं असून यातून एक सुंदर मॅसेज देखील दिला आहे. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अतिशय साधेपद्धतीने साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांवर खूप मोठा ताण आला. डॉक्टर हे खरे देवदूत असतात याची जाणीव या काळात झाली. त्यांनाच हा व्हिडिओ समर्पित केलं आहे. 



या व्हिडिओत अमृता फडणवीस कुटुंबातील स्त्रीची भूमिका साकारत आहे. गणरायाच्या आगमनानंतर स्त्री संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष देत आहे. बाप्पाचं आगमन झालं आहे घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असताना अचानक त्यांच्या मोबाईलवर मॅसेज येतो. आणि ती स्त्री घरातील जबाबदारी पार करून आपली आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होते.