अमृता खानविलकरला घाम येतो का? अभिनेत्रीनं दिलं मजेशीर उत्तर
अमृता खानविलकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
मुंबई : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमृता ही तिच्या बिनधास्त आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. फक्त अभिनय नाही तर तिच्या सौंदर्य ती नेहमीच चर्चेत असते. अमृता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच अमृतानं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिला एका चाहतीनं विचित्र प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर अमृतानं एका हटके अंदाजाता उत्तर दिलं आहे.
अमृतानं झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शोची निर्मिती ही खास महिलामंडळीसाठी करण्यात आली. या शोमध्ये फक्त महिला सेलिब्रेटी सहभागी होत असतात. नुकतंच या शोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यांनतर आता अभिनेत्री अमृता खानविलकरने शोमध्ये हजेरी लावली आहे. यामध्ये सुबोध भावे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे.
कार्यक्रम सुरु असताना एका अभिनेत्रीनं अमृताला एक मजेशीर प्रश्न विचारला की तो ऐकल्यानंतर अभिनेत्रीला हसू अनावर झालं. या शोमधील एका अभिनेत्रीनं अमृताला विचारलं की, 'तुम्हाला घाम येतो का?' यावर अमृता हसत-हसत उत्तर देतं म्हणाली, 'तू हा मला प्रश्न विचारलास हे तर ठीक आहे. पण नंतर यावर मिम्स किती तयार होणार याची तुला कल्पनासुद्धा नाहीयं.'
अमृता पुढे म्हणाली, 'अभिनेत्री असले तरी मी एक माणूस आहे आणि निश्चितच मलासुद्धा घाम येतो. पण शूटिंगदरम्यान सेटवर मी माझासोबत एक छोटा फॅन ठेवते. जेणेकरून मला कमीत कमी घाम येईल याची मी काळजी घेते आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणहून या मुंबईमध्ये आल्यांनतर तुम्हाला उष्णतेची जाणीव होतेच.'
अमृताच्या कामाबाबत सांगायचं झालं तर, ती नुकतीच 'चंद्रमुखी' या चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट आणि यातील गाणी प्रचंड हिट ठरली आहेत. या चित्रपटातील 'चंद्रा' हे गाणं आणि अमृता खानविलकरचा डान्स तुफान लोकप्रिय झाला होता. या गाण्यावर अनेक व्हिडीओ रील्स बनवण्यात आले आहेत.