मुंबई :  इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी तर रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असातात.  एका अभिनेत्रीने हॉटेल रूममध्ये बॉयफ्रेंडकडे अशी काही मागणी केली, की बॉयफ्रेंड थेट रुग्णायलात दाखल झाला. अखेर 10 वर्षांनंतर अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीचं नाव आहे अमृता राव. अमृताने फक्त अभिनयानेचं नाही तर सौंदर्याने देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असणारी अमृता बॉयफ्रेंडसोबतच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अमृताचं लग्न आरजे अनमोलसोबत झालं आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करताना दिसतात. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.



आता देखील त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी व्हिडीओ शो 'कपल ऑफ थिंग्स'मधून शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच्या अनेक गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. 


‘मिशन रंग बरसे’च्या सीनसाठी दोघे हॉटेलचा रुम बूक करतात. रुममध्ये दोघे काहीतरी  पेय घेतात. फक्त एक घोट प्यायल्यानंतर अमृता ते पित नाही. त्यानंतर दोन्ही ग्लास अनमोल पितो. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. 


तेव्हा ज्याप्रकारे त्यांनी सर्व परिस्थिती सांभाळली ते सर्व व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं आहे. तेव्हा अमृता आणि अनोमलच्या मदतीसाठी त्याची बहिण अंकिता पोहोचते.  दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.