मानसोपचार घेण्यात लाज कसली?- अमृता
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात किंवा कोणत्याही क्षेत्रात एका ठराविक वेळेनंतर असुरक्षितता वाटते.
मुंबई : 'वेड झालं की मानसोपचार घेणं ही फार ढोबळ कल्पना आहे. अशी समज आपल्या समाजात आहे' अशी भावना अभिनेत्री अमृता सुभाषने व्यक्त केली आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात किंवा कोणत्याही क्षेत्रात एका ठराविक वेळेनंतर असुरक्षितता वाटते. अशा वेळेस अपयश आलं की अगदी खचून गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे कोणाचातरी सल्ला घेणे तितकचं महत्त्वाचं असतं. अभिनय क्षेत्रात वयाच्या प्रत्येक टप्प्यात असुरक्षितता वाटते. त्यामुळे 'मी मनासोपचार घेते, मी सल्ला घेते.' असं अभिनेत्री अमृता सुभाषने 'झी २४ तास'सोबत बोलताना उघडपणे सांगितले.