Hollywood Actress Kiss at Gateway of India: जगातील सर्वात रोमॅण्टिक सिटी कोणती असा प्रश्न विचारला तर समोर येतं ते म्हणजे पॅरिस किंवा युरोपातील कुठलंतरी एक शहर. परंतु आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण खास ठिकाणीची काय गरज अशीही आपली भावना असते. त्यातून आधी म्हटल्याप्रमाणे ज्या तऱ्हेने लोकं खास पॅरिसमध्ये आयफिएल टॉवरच्या खाली जातात त्यांच्यासाठी असा रॉमेण्टिक क्षण अनुभवणे म्हणजे एक वेगळीच पर्वणी असते. त्यातून आता मात्र चित्र उलट दिसून आलं आहे. चक्क हॉलिवूडच्या एका लोकप्रिय कपलनं आपला रोमॅण्टिक क्षण अनुभवण्यासाठी गेट ऑफ इंडियाच्या समोर उभं राहतं लिपलॉकचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यावेळी त्यांना आजूबाजूचे भानच राहिले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशीच एक अभिनेत्री भारत दौऱ्यावर आली होती. ज्यावेळी तिनं आपल्या पार्टनरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं ताज महाल हॉटेलला भेट दिली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे एमी जॅक्सन. ही अभिनेत्री हॉलिवूडसह अनेक हिंदी आणि तामिळ चित्रपटांमध्येही दिसली आहे. 2012 साली आलेला प्रतीक बब्बरचा 'एक दिवाना था' हा चित्रपट तुम्हालाही आठवत असेलच. त्यातील होसाना हे गाणंही आठवत असेलच. या चित्रपटात एमी जॅक्सन होती. सध्या तिन एड वेस्टवीकसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं आणि एडनं आपल्या इन्टाग्राम पेजवरून आपले हे रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत. 


हेही वाचा - 'बाईपण भारी देवा'च्या यशावर वंदना गुप्तेंचं वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या, 'आम्ही शाहरूख-सलमानलाही...'


सध्या त्या दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. आता सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे या फोटोखाली येणाऱ्या कमेंट्सची. त्यातून अमृता खानविलकर या मराठमोळ्या अभिनेत्रीनंही त्यांच्या या फोटोवर कमेंट केली आहे. सध्या तिच्या या फोटोला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. 


हेही वाचा - 'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा



एमी ही अक्षय कुमारच्या 'सिंग इज ब्लिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. 2006 पासून ती या क्षेत्रात सक्रिय आहे. एड वेस्टवीक हा देखील एक ब्रिटिश अभिनेता आहे. तुम्ही त्यांचे फोटो पाहिलेत का?