मुंबई : रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ति डिमरी और रश्मिका मंदानाचा सिनेमा एनिमल रिलीज होवून एक महिना होणार आहे. फिल्मने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकवर्ग या सिनेमावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अॅनिमलमध्ये रणबीर कपूर शिवाय बॉबी देओलच्या भूमिकेलादेखील चाहते प्रेम देत आहेत. सिनेमातील त्याच्या पात्राचं नाव अबरार होतं. बॉबी देओलने ही भूमिका एकही शब्द न बोलता साकारली आहे. हे लक्षात घेऊन अॅनिमल दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी अबरारवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या दिवसांत अॅनिमलचे प्रोड्यूसर सिनेमाचा सिक्वलच्या तयारीत आहेत. अॅनिमलचा सिक्वल २०२६ मध्ये येवू शकतो. जो बॉबी देओलचं कॅरेक्टर अबरारचा एक स्पिन ऑफ असेल. मात्र असं बिलकूल नाही की, अॅनिमलचा हा स्पिन ऑफ दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीच केला पाहिजे. मात्र अशी बातमी असली तरी अद्याप अबरारच्या या सिनेमाबाबत सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी कोणतीही अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. 


अॅनिमलच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या आंकड्यांनुसार भारतात 534.44 कोटी रुपयांचं  कलेक्शन एनिमलने केलं आहे. तर जगभरात 864 कोटी रुपयांहून अधिक कमाई या सिनेमाने केली आहे.तर इंडिया ग्रॉस 634.65 करोडपर्यंत पोहचला आहे. कौतुकास्पद हे आहे की,  अॅनिमल 2023 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
 
1 डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'अ‍ॅनिमल' सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. याच पॅटर्नअंतर्गत 'अ‍ॅनिमल' चित्रपट जानेवारीच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाऊ शकतो. या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत. चित्रपट रिलीज होऊन जवळ-जवळ एक महिना होईल. तरिही चित्रपटगृबाहेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची संधी सोडण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. तर अनेकजण हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. जेणेकरुन कुटुंब किंवा मित्रांसह अत्यंत आरामशीरपणे घऱी बसून या चित्रपटाचा आनंद घेता येईल.