मुंबई : पहिल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या यशानंतर, झी 5 ने पुढच्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलची घोषणा केली आहे. चार पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांच्या चार चित्रपटांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये 'अनामिका' आणि 'अरेंज्ड मॅरेज' आज प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरस्कार विजेते दिग्दर्शक, प्रदीप सरकार आणि प्रियदर्शन यांच्याद्वारे 45 मिनिटांच्या या लघुपटांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे. प्रेमाला अधुनिक काळाचा दिलेला विचाराने प्रेक्षकांचे लक्ष्य आपल्याकडे आपसूक ओढून घेतले आहे.



'अनामिका'मध्ये आदित्य सील, पूजा कुमार आणि हर्ष छाया दिसणार असून 'अरेंज्ड मॅरेज' मध्ये अली फजल, पत्रलेखा आणि ओमकार कपूर सारखे स्टार कलाकार आहेत.  याचाच अर्थ, या चित्रपटांमध्ये केवळ राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शकच नाही आहेत, तर प्रतिभाशाली आणि पुरस्कार विजेते कलाकार देखील आहेत.


शॉर्ट फिल्म फेस्टिवलला दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आला असून याचा पहिला भाग 9 सप्टेंबर 2020 तर दूसरा 24 सप्टेंबर 2020 ला प्रदर्शित करण्यात येणार आहे. निश्चितच, झी 5 आपल्या अनोख्या कंटेंटमुळे प्रेक्षकांचे खूप कौतुक मिळवत आहे.