मुंबई : झी युवा वरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली गुलमोहर ही मालिका हृद्यस्पर्शी आणि सुंदर प्रेमकथांमुळे तरुणांच्या मनाचा ठाव घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताची पिढी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेली आहे, मग ते प्रेमी असतील, आई, वडील, किंवा भावंडांच्या संदर्भातील असेल. ते त्यांच्या जीवनातील प्रेमाची किंमत हरवून बसले आहेत. गुलमोहर या मालिके मधून प्रत्येक आठवड्याला खरे प्रेम काय असते हे वेगवेगळ्या प्रेमकथांमधून तरुणांना दाखविले जात आहे. या आठवड्यात गुलमोहर अनामिका ही कथा सादर करणार आहे. भिन्न स्वभावाचे दोन जे शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडतील किंवा नाही हे पाहणे रंजक ठरेल.  


काय आहे अनामिका? 


अनामिका या आगामी कथेमध्ये मराठी रंगभूमी आणि सिनेमातील दोन नावाजलेले कलाकार पर्ण पेठे आणि अक्षय टांकसाळे छोट्या पडद्यावर मधुरा आणि श्रेयस यांची भूमिका करताना दिसणार आहेत. मधुरा ही अगदी साधी आणि सरळमार्गी मुलगी आहे तर श्रेयसचे व्यक्तिमत्व त्याच्या अगदी विरुद्ध आहे. अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला श्रेयस अगदी मोकळ्या वातावरणात वाढला आहे, तसेच तो वडिलांच्या खूप जवळचा आणि लाडका मित्र आहे.


मधुराला लिहिण्याची खूप आवड आहे आणि तिचे विचार तिला कागदावर लिहीण्याची आवड आहे. ती खूप सर्जनशील आहे आणि ती वेगवेगळ्या कथा लिहिण्याचा आनंद घेत असते. एका विशिष्ट दिवशी, श्रेयस मधुराने लिहिलेली कथा वाचतो आणि लगेच तिच्या प्रेमात पडतो. पण श्रेयस कथेच्या की कथा लिहिणारीच्या प्रेमात पडतो हा प्रश्नच आहे?


पर्ण पेठे सांगतेय अनुभव


अनामिकसाठी चित्रीकरण करण्याचा अनुभव सांगताना पर्ण पेठे म्हणाली, "माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा अगदी वेगळी असलेली मधुराची आव्हानात्मक भूमिका मी स्विकारली. मंदार देवस्थळीसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे. अनामिका ही गोष्ट अतिशय लक्षवेधक आहे आणि प्रेक्षकांना ती खूप आवडेल. यामध्ये फक्त प्रेमिकांचेच नाही तर आई-मुलगी, शिक्षक-विद्यार्थी, मित्रत्व अशा अनेक नात्यांचे वर्णन केलेले आहे." 


नात्यांचा मुलायम संयोग आणि अनोळखी भावनेतून निर्माण झालेली अनामिका प्रेमकथा. पाहण्यासाठी, पहायला विसरु नका गुलमोहर प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वाजता फक्त झी युवा वर