मुंबई : सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या नावाची सध्या चर्चा आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. साराने अनेकदा कार्यक्रमात कार्तिकबद्दल बोलताना पाहिलं आहे. असं असताना आता कार्तिक आर्यन अनन्या पांडेसोबत डिनर डेटला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्या पांडे करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईअर 2' सिनेमाने आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. 30 ऑक्टोबर रोजी अनन्या पांडे 21 वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन करण्यात आलं. सोशल मीडियावरही तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. यंदाचा वाढदिवस अनन्यासाठी खास होता. 



अनन्या पांडे वाढदिवसादिवशी कार्तिक आर्यनसोबत डिनर डेटवर गेला. पण हे दोघं वेगवेगळे दिसले पण या दोघांनी एकत्र वेळ घालवल्याचं कळलं. कारमध्ये बसलेली अनन्या पांडे फोनवर बिझी होती यावेळी तिने व्हाइट रंगाचा टीशर्ट घातला होता 


कार्तिक आर्यनने 'पती, पत्नी और वो'च्या सेटवर भूमी पेडणेकरसोबत अनन्याचा वाढदिवस साजरा केला. कार्तिकने व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्याने अनन्याला 31 वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्याचा हा 21 वा वाढदिवस आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 



कार्तिक आर्यनच्या लूक्सबद्दल बोलायचं झालं तर त्याने निळ्या रंगाचा चेक्स शर्ट घातला आहे. खूप दिवसांपासून कार्तिक आर्यनच्या नावाची चर्चा सारा अली खानसोबत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो अनन्यासोबतही दिसत आहे. अनन्यासोबत 'पती, पत्नी और वो' या सिनेमांत कार्तिक दिसणार आहे.