वडिलांच्या `त्या` कृत्यामुळे अनन्या मित्रांना कधीचं घरी बोलवत नाही
चंकी पांडेने असं काय केलं, ज्यामुळे मुलगी अनन्या तिच्या मित्रांना कधीचं घरी बोलवत नाही...
मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेचा 'गहराइया' सिनेमा नुकताचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वत्र फक्त सिनेमाची चर्चा होती. पण प्रदर्शनानंतर सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. सिनेमात अनन्या शिवाय दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि धैर्य कारवा (Dhairya Karwa) मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी जोरदार प्रमोशन देखील करण्यात आलं. सिनेमातर लोकांना आवडला नाही, पण प्रमोशन दरम्यान अनन्याने अशा एका गोष्टीचा खुलासा केला. जी कोणाला माहिती नाही.
मुलाखती दरम्यान अनन्याला 'तू मित्रांना घरी का बोलवत नाहीस...' असा प्रश्न वितारल्यानंतर अनन्याने वडिलांच्या एका सवयीबद्दल सांगितलं. ज्यामुळे अनन्या तिच्या मित्रांना घरी बोलवत नाहीत.
प्रश्नाचं उत्तर देत अनन्या म्हणाली, 'माझे वडिल कायम घरी टॉवेलवर फिरत असतात... म्हणून मी माझ्या मित्रांना घरी बोलवत नाही. तरी देखील तुम्हाला माझ्या घरी यायचं असेल तर तुम्ही येवू शकता...' सध्या पांडे कुटुंबातील हा किस्सा तुफान चर्चेत आहे.
'गहराइया' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 11 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. पण सिनेमा समाधनकारक प्रतिसात मिळत नसल्याने यशस्वी ठरला नाही.