मुंबई : डान्स आणि सौंदर्य तसंच तिच्या स्टाईलमुळे अभिनेत्री अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. कायम स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत अनन्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता नवं वर्षाच्या सुरूवातीला अनन्या पुन्हा एकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या अनन्याचे नव्या वर्षांतील नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्या या फोटोंमध्ये अगदी वेगळी दिसत आहे. यावेळी अनन्या फार सुंदर हेयरस्टाईल केली आहे. फ्रिंज कट ओपन कर्ल हेअर्स अनन्याच्या लुकला साजेसा आहे. अॅक्सेसरीज म्हणून अभिनेत्रीने फक्त कानातले घातले आहेत.



अनन्या पांडेने तिच्या बदललेल्या लूकचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'नवीन वर्ष, नवीन मी?' अनन्याचे हे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही हैराण झाले आहेत. 


संजय कपूर, नीलम कोठारी, सीमा खान, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत, शनाया कपूर, सुहाना खान यांना अनन्याचा लूक आवडला आहे. सुहानाने तिच्या बेस्टफ्रेंडच्या लूकवर 'SEXC' अशी कमेंट केली आहे.