Good News : अभिनेता चंकी पांडे (Chunkey Pandey) आणि त्याची लेक, अनन्या पांडे (Anannya Pandey) इतकंच नव्हे, तर सध्या संपूर्ण पांडे कुटुंबच कमालीचं आनंदात दिसत आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर सध्या आनंदच पाहायला मिळत आहे. कारण? कारण ठरतेय ती एक गोड बातमी. ही गोड बातमी सध्या पांडे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खऱ्या अर्थानं एक वेगळीच अनुभूती देऊन जात आहे. कारण या कुटुंबात आता एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबात नव्या सदस्याच्या येण्यानं प्रत्येकाची बढतीही होणार आहे. थोडक्यात चंकी पांडे आणि त्याचा भाऊ चिक्की पांडे आजोबा होणार आहेत. तर, त्यांच्या पत्नी आजी होणार आहेत. पांडे कुटुंबात एका बाळाची चाहूल लागली असून, ही गोड बातमी ऐकून अनन्या पांडेचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राहिला प्रश्न ही गोड बातमी देतंय कोण? तर, त्याचंही उत्तर सोशल मीडियामुळं मिळालं आहे. 


चंकी पांडेच्या भावाची लेक, अर्थात अनन्या पांडेची चुलत बहीण, अलाना पांडे (Alanna Panday Pregnancy) आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अलानाला तिच्या Pregnancy ची बातमी मिळाली आणि तिनं पती, आयवरसह मिळून कुटुंबालाही या आनंदात सहभागी करून घेतलं. अलाना आणि आयवरनं मिळून या सुरेख क्षणांचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला. ज्यामध्ये पांडे कुटुंबाला जेव्हा अलानाच्या गरोदरपणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा होत्या हे या व्हिडीओतून पाहायला मिळालं. 



हेसुद्धा वाचा : साईड सबकुछ! सेलिब्रिटींच्या गर्दीत अनिल कपूरच्या पुतणीनं वळवल्या नजरा; Black गाऊन लूक एकदम झकास... 


अनन्याला जेव्हा ती मावशी होणार असल्याचं कळलं तेव्हा तिला नेमकं कसं व्यक्त व्हावं हेच कळेना. मी अमुक करेन, तमुक करेन असं ती उत्साहाच्या भरात म्हणताना दिसली. तर, चंकी पांडेला जेव्हा त्याची पुतणी आता आई होणार आहे हे कळलं तेव्हा त्याचाही यावर विश्वास बसेना. ज्या लहान मुलांना मोठं केलं ती आता खुद्द पालकांच्या भूमिकेत दिसणार या जाणीवेनं तो काहीसा भावूकही झाला. सोशल मीडियावर सध्या पांडे कुटुंबाचे हे आनंदाचे क्षण अेकांच्या चेहऱ्यावर हसू आणताना दिसत आहेत.