साईड सबकुछ! सेलिब्रिटींच्या गर्दीत अनिल कपूरच्या पुतणीनं वळवल्या नजरा; Black गाऊन लूक एकदम झकास...

Shanaya Kapoor Photos : अर्ध्याहून अधिक बॉलिवूडही जामनगरमध्ये पाहायला मिळालं. दिग्गज कलाकार म्हणू नका किंवा मग नव्या जोमाचे कलाकार. सर्वांनीच जामनगर गाठलं होतं. 

Mar 06, 2024, 12:21 PM IST

Shanaya Kapoor Photos : जामनगर येथे पार पडलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant pre wedding) याच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. या सोहळ्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक ख्यातनाम पाहुण्यांनी हजेरी लावली होती. 

 

1/7

सेलिब्रिटी कुटुंब

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

कपूर, बच्चन (Kapoor and Bachchan Family) अशी कलाजगतातली सेलिब्रिटी कुटुंबही अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी हजर राहिली आणि या सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये या मंडळींनी अगदी घरातल्या कार्यक्रमाला लावतात तशीच हजेरी लावली. 

2/7

एकाहून एक सरस लूक

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे एकाहून एक सरस लूक इथं चर्चेचा विषय ठरले. या साऱ्यामध्ये एका चेहऱ्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. हा चेहरा कोणाचा होता माहितीये? हा चेहरा होता अनिल कपूरच्या पुतणीचा, अर्थात अभिनेत्री शनाया कपूरचा. अभिनेता संजय कपूरची ही लेक.

3/7

तिचं स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्स

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

शनाया अद्याप कलाजगतामध्ये फारशी प्रसिद्धीझोतात आली नसली तरीही तिचं स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्स कायमच लक्ष वेधून जातो. जामनगरमधी सोहळाही यास अपवाद ठरला नाही. 

4/7

ऑफशोल्डर आणि लाँग स्लीव्ह्ज

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

शनायानं या सोहळ्यात एकाहून एक सरस लूक केले. यामध्ये सर्वाधिक कमाल ठरला तो म्हणजे काळ्या रंगाच्या गाऊनमधील लूक. ऑफशोल्डर आणि लाँग स्लीव्ह्ज असणाऱ्या या लूकमध्ये ती एखाद्या हॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसत होती. 

5/7

साजेसं स्टायलिंग

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

फ्रन्ट पार्टींग आणि मागे लाल रंगाच्या फुलाचं सुरेख काम असणाऱ्या या गाऊनवर शनायानं गडद लाल रंगाची लिपस्टीक आणि किमान ज्वेलरीला पसंती दिली होती. साईड पार्टीशन असणाऱ्या तिच्या हेअरस्टाईलनं हा लूक आणखी प्रभावी केला होता. 

6/7

तिच्या एका नजरेनं अनेकजण घायाळ

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

शनाया आली, तिनं पाहिलं आणि तिच्या एका नजरेनं अनेकजण घायाळ झाले. या संपूर्ण सोहळ्यादरम्यान शनायानं भारतीय आणि पाश्चिमात्य पेहरावांना पसंती दिली होती. 

7/7

शनाया प्रत्येक वेळी कमालीची Confident

shanaya kapoor dazzeles in black as she attends anant ambani radhika merchant pre wedding bash

साडी, हाय वेस्ट पँट्स, लेहंगा, गाऊन या आणि अशा अनेक लूकला पसंती देणारी शनाया प्रत्येक वेळी कमालीची Confident दिसत होती. कपूर कुटुंबातील हा नवा चेहारा आता कलाजगतामध्ये आपलं स्थान नेमकं कसं नर्माण करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.