मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसचं आहे. अलानाचे बॉयफ्रेंडसोबत काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अलाना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या अलाना तिच्या बॉयफ्रेंडसोबत मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिने यादरम्यानचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलानाचे फोटो फार इंटिमेट आहेत. अलानाने सोशल मीडियावर काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनायाच्या बॉयफ्रेंडचं नाव आइवर मॅकक्रे व्ही (Ivor McCray V) असं आहे. 


अनाया पांडे ही अभिनेता चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे. अलाना परदेशी तिच्या बॉफ्रेंडसोबत लिवइनमध्ये राहात आहे. आता अलाना आणि तिचा बॉयफ्रेंड मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या अलानाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.