मुंबई : हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जॉलीनं ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घ्यायचा निर्णय मागे घेतला आहे. हा निर्णय घेऊन अँजेलिनानं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. २०१६ साली सप्टेंबरमध्ये अँजेलिना आणि ब्रॅड पिटनं वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता आणि घटस्फोटाचा अर्जही केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रॅड पिटच्या व्यसनांमुळे अँजेलिना हैराण झाली होती. लॉस अॅजेलिसला जात असताना विमानामध्ये ब्रॅडनं दारू पिऊन त्याचाच मुलगा मॅडॉक्ससोबत वाद घातला. या सगळ्याच्या त्रासामुळे अँजेलिनानं घटस्फोटाचं टोकाचं पाऊल उचललं. याचबरोबर अँजेलिनानं त्यांच्या सहा मुलांचा ताबाही घेतला. यानंतर ब्रॅडनं व्यसन सोडण्यासाठी उपचार घेतले त्यामुळे आता ब्रॅड आणि अँजेलिनानं घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला आहे.