मुंबई : 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील भाभी सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे तिचं घर सोडून जाणं आहे. अंगूरी भाभी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रेने घर सोडण्याचा फुल प्रूफ प्लान बनवला आहे. ती कुठे जात आहे हे अद्यापतरी तिने कोणालाही सांगितलं नाहीये. एक व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने ही गोष्ट सांगितलीये. तिच्या या व्हिडिओवर अभिनेता शाहिद कपूरही तिला असं करू नकोस असं समजावत आहे मात्र तरिही अभिनेत्री हे मानायला तयारच नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही विचार करत असाल की हे नेमकं काय प्रकरण आहे... तर अंगूरी भाभी घर सोडून जातेय आणि शाहिद कपूरचा तिच्याशी काय संबंध? जर सगळं काही तुमच्या डोक्यावरून जात असेल तर हा व्हिडिओ पहा. तुम्हाला स्वतःहूनच सगळं काही समजेल.


जब वी मेटच्या डायलॉगवर अभिनेत्री शुभांगी अत्रे गीतच्या भूमिकेत दिसत आहे. म्हणजेच करीना कपूर आणि याच कारणामुळे आदित्य म्हणजेच शाहिद तिला समजावतोय. शुभांगी अत्रेने हे फनी रिल्स इंस्टाग्रामवर शेअर केलं असून सर्वांना तिची ही स्टाइल प्रचंड आवडली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ड्रामा क्वीन शुभांगी अत्रे
तसं, शुभांगी अत्रेने असा व्हिडिओ शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, तर शुभांगी अत्रे ही ड्रामा क्वीन असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ शेअर करत असते जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. शुभांगीला कॉलेजच्या दिवसांपासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे एमबीए केल्यानंतर तिने अभिनयातच काहीतरी करायचं ठरवलं.