मुंबई : शाहरूख खानचा मुलगा अबराम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बी यांची नातं आराध्याच्या बर्थ डे पार्टीतील अबरामचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच काय तर अबराम बिग बींना आजोबा समजतो याचा पुन्हा एकदा खुलासा झाला आहे. असं सगळं असताना अबरामचा एक भडकलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबराम लहान असताना त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. एवढंच नव्हे तर मीडियाशी देखील अबराम चांगला रिअॅक्ट व्हायचा पण आता 5 वर्षांचा अबराम मात्र मीडियावर भडकल्याचं समोर आलं आहे. 



अबराम एका व्हिडिओत भरपूर भडकल्याचं दिसत आहे. आराध्याच्या बर्थ डे पार्टीनंतर अबरामचे फोटो घेताना तो मीडियावर भडकला. फोटोग्राफर्सपासून चेहरा लपवणारा अबराम एकदाच भडकला आणि No Pictures असं सांगून रागावला. 


अबरामचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अबरामचं हे रूप सगळ्यांनाच धक्कादायक आहे. या अगोदर अनेकदा त्याचा क्यूट व्हिडिओ शेअर झाल्याचं पाहिलं आहे.