नवी दिल्ली : अभिनेता अनिल कपूर याने आपल्या आगामी 'फन्ने खान' या सिनेमाचं शूटींग सुरु केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हे तब्बल १७ वर्षांनी एकत्र येणार आहेत.


अभिनेता अनिल कपूर याने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सिनेमाच्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना अनिल कपूरने म्हटलं आहे की, "आणि काहीतरी नविन आणि खूपच खास गोष्टीची सुरुवात करत आहोत. सुरुवातीचे हे दिवस खूपच चांगले आहेत. 'फन्ने खान'. शूटींग सुरु.



ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या डच सिनेमा 'एव्हरीबडीज फेमस' या सिनेमाचा 'फन्ने खान' हा सिनेमा रिमेक असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकर करणार आहेत.


या सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय, राजकुमार राव सारखे सितारे महत्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत. ऐश्वर्या आणि अनिल मोठ्या पडद्यावर जवळपास दोन दशकांनी एकत्र येत आहेत. यापूर्वी २००० साली 'हमारा दिल आपके पास है' आणि १९९९ सालचा हिट सिनेमा 'ताल' मध्ये हे दोघं एकत्र आले होते.